Maruti Stotra
Maruti Stotra भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।।१।। महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ।।२।। दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा । पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ।।३।। लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ।।४।। ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें …